दिसपूर : आसाममधील एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या ४० टक्के असल्याचा दावा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी केला. मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा दावा एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आसाममधील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली.
ते म्हणाले की, आसाममध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत झालेली वाढ हा चिंतेचा विषय आहे. राजकारण करण्यासाठी मी हा विषय उपस्थित करीत नाही. आपल्यासाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला काही जागांवर विजय प्राप्त झाला आहे.
१९५१ साली आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १२ टक्के होती. विशिष्ट धर्माच्या लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे कॉंग्रेसला लाभ होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. केंद्र आणि आसाम सरकारकडून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असतानाही आसाममध्ये धार्मिक हिंसाचार घडवून आणला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.