Murshidabad violence | मुर्शिदाबाद हिंसाचाराचा तपास एसआयटीकडे file photo
राष्ट्रीय

मुर्शिदाबाद हिंसाचार : वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी झियाउल शेखला अटक

Murshidabad Violence : पोलिसांना मिळाले अनेक पुरावे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Murshidabad Violence : बंगालमध्ये वक्फ संशोधन कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात वडील आणि मुलाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शमशेरगंजमधील जाफराबाद येथे दोन जणांच्या हत्येप्रकरणी ही चौथी अटक आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख जाफराबादच्या शेजारच्या सुलिताला पुरबापारा गावातील जियाउल शेख अशी झाली आहे. तो 12 एप्रिल रोजी गुन्हा घडल्याच्या दिवसापासून फरार होता.

चोप्रा येथून अटक

जियाउल दारोदारी फिरून कपडे विकण्याचे काम करत होता. अशा परिस्थितीत त्याने ही हत्या का केली, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, विशेष कार्य बल (STF) आणि विशेष तपास पथक (SIT) यांनी शनिवारी (दि. 19) उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा येथे असलेल्या ठिकाणाहून जियाउल शेखला अटक केली.

पोलिसांना मिळाले अनेक पुरावे

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘जियाउल शेख हा मुख्य आरोपींपैकी एक आहे, ज्याने कट रचून 12 एप्रिल रोजी हरगोबिंदो दास आणि त्याचा मुलगा चंदन दास यांच्या घरावर तोडफोड करण्यासाठी आणि त्यांची हत्या करण्यासाठी जमावाला चिथावले होते. पोलिसांकडे 12 एप्रिल रोजी गुन्हा घडलेल्या ठिकाणी त्याची उपस्थिती सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज, तसेच त्याच्या मोबाईल फोनशी संबंधित माहिती यांसह अनेक महत्त्वाचे पुरावे आहेत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT