Murder Case file photo
राष्ट्रीय

Murder Case: बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधाचा घेतला सूड! संतापलेल्या भावाने मित्राचाच केला खून

Uttar Pradesh crime news: बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याल्याच्या रागातून एका तरूणाने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना जमवारा गावात घडली आहे.

मोहन कारंडे

Murder Case

उत्तर प्रदेश: बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याल्याच्या रागातून एका तरूणाने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील जमवारा गावात घडली आहे. १७ जानेवारी रोजी या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा झाला. जंगलात नदीकाठी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर वार करण्यात आले होते.

तौहीद हसन असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून राशिद खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तौहीद हसनचे राशिद खानच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते, ज्यामुळे राशिद गेल्या काही महिन्यांपासून संतापलेला होता. याच रागातून त्याने त्याचा मित्र आनंद कुमार याच्यासह हत्येचा कट रचला. दोघांनी तौहीदला बहाणा करून जमवारा गावात बोलावले. तेथून त्याला जंगलात नेले आणि त्याच्या धारधार हत्याराने सुमारे १४ वार केरून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह निर्जन ठिकाणी नदीकाठी फेकून देऊन ते मध्य प्रदेशच्या दिशेने पसार झाले.

घटना उघडकीस कशी आली?

जंगलात नदीकाठी रक्ताच्या थारोळ्यात तौहीदचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नरैनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना आणि जिल्ह्यांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांना मृताच्या पॅटवर असलेल्या एका टेलरच्या 'लोगो'वरून महत्त्वाचा सुगावा लागला. त्या लोगोवर मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका टेलरचे नाव होते. पोलीस त्या टेलरच्या दुकानात पोहोचले आणि बिल बुकच्या आधारे त्या तरुणाची ओळख मध्य प्रदेशातील पन्ना येथील रहिवासी तौहीद हसन अशी पटली.

यानंतर बांदा पोलिसांनी पन्ना पोलिसांच्या मदतीने मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी सांगितले की, तौहीद मित्रांसोबत फिरायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स आणि सर्व्हिलन्सच्या आधारे त्याच्या राशिद खान आणि आनंद कुमार या दोन मित्रांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT