राष्ट्रीय

Mumbai- Ahmedabad bullet train | मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर!

नवी दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात प्रदर्शित केले छायाचित्र

Namdev Gharal

Mumbai- Ahmedabad bullet train अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या, भारताच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनचा 'पहिला लूक' (First Look) नवी दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात प्रदर्शित करण्यात आला आहे; यातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एक झलक पाहायला मिळते. देशात सर्वाधिक चर्चेत असलेला रेल्वे प्रोजेक्ट म्हणजे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. मोदी सरकारचा हा अतिशय महत्‍वकांक्षी प्रोजेक्ट आहे.

जपानच्या सहकार्यातून भारतातील हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु आहे. आता रेल्वे मंत्रालयाने या ट्रेनचे पहिले छायाचित्र प्रदर्शित करत बुलेट ट्रेन लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या इमारतीमधील 'गेट क्रमांक ४' (Gate Number 4) येथे या हाय-स्पीड ट्रेनचे एक छायाचित्र लावण्यात आले आहे. या छायाचित्रातून बूलेटट्रेनच्या रचनेचा अंदाज येतो. वृत्तसंस्था 'एएनआय'ने (ANI) हे वृत्त दिले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारताचा पहिला हाय-स्पीड रेल प्रकल्प आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) द्वारे राबवला जात आहे. या ट्रेनसाठी जपानच्या जगप्रसिद्ध 'शिनकानसेन' (Shinkansen) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

असा आहे प्रकल्प

एकूण अंतर : सुमारे ५०८ किमी (महाराष्ट्र: १५५.७६ किमी, गुजरात: ३४८.०४ किमी, दादरा आणि नगर हवेली: ४.३ किमी) ही ट्रेन ताशी ३२० किमी कमाल वेगाने धावणार असून मुंबई - अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान सध्या प्रवासासाठी ६ ते ७ तास लागतात. बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या २ ते २.५ तासांत पूर्ण होणार आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर १५ ऑगस्ट २०२७ रोजी सुरू करण्याचे नियोजित आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन १४ सप्टेंबर २०१७ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हस्ते अहमदाबाद (साबरामती) येथे करण्यात आले होते. आता हे काम दृष्टीक्षेपात आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एक भाग म्हणून बोगद्याच्या बांधकामासाठी, मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे पहिली 'टनेल बोरिंग मशीन' (TBM) उतरवण्यात आल्याचे 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (NHSRCL) ने जाहीर केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी भारताच्या या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT