रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 105 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्ज इंडियाने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 92 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी आणि कुटुंब दुसर्या स्थानी आहेत.
अंबानींनंतर पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब 92 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्या स्थानावर आहेत. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
या यादीत अनेक नवीन चेहर्यांचा समावेश झाला आहे, ज्यात वारी एनर्जीजचे दोशी बंधू 37 व्या स्थानी (7.5 अब्ज डॉलर्स) आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजचे सुनील वचानी 80 व्या स्थानी (3.85 अब्ज डॉलर्स) आहेत.
भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांच्या एकूण संपत्तीत 9 टक्के घट होऊन ती 1 ट्रिलियन डॉलर्सवर आली आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि मागील मूल्यांकनापासून सेन्सेक्स शेअर निर्देशांकात झालेल्या 3 टक्के घसरणीमुळे घट झाली आहे.