Dhirubhai Ambani and Mukesh Ambani  pudhari photo
राष्ट्रीय

World’s Largest Refining Hub : जागतिक ऊर्जा नकाशाला गुजरातचे गिफ्ट !

'नवयुग गुजरातचे शिल्पकार' मुकेश अंबानी यांनी जामनगरला बनवले जगातील सर्वात मोठे रिफायनिंग हब अन् उद्याच्या नवऊर्जा गिगा फॅक्टरीजचे माहेरघर

पुढारी वृत्तसेवा

धीरूभाई अंबानींनी भारतातील बचत करणाऱ्यांना भागधारक कसे बनवले, बड्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन मालक होण्यास कसे शिकवले, हे आपण जाणतोच, शेअर्सच्या मालकीतून येणारा वारसा जपण्याची समृद्ध परंपराही धीरूभाईंनी निर्माण केली. हा प्रवासही उद्‌बोधक आहे.

१९७७ पासून रिलायन्सचे शेअर्स जपून ठेवलेल्या कुटुंबांसाठी २००६ मध्ये पुन्हा एकता परिचित अशी बातमी आली, रिलायन्स पेट्रोलियम एका मोठ्या सार्वजानिक इश्यूसह बाजारात येत होती. रिलायन्सचा आणखी एक मोठा व्यवसाय सामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात येत होता. २००९ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलीन झाली.

रिलायन्सच्या संस्थापकांनी निर्माण केलेला वारसा आजही अबाधित आहे. सामान्य गुंतवणूकदारांशी रिलायन्सने निर्माण केलेले नाते कायम असल्याचेच हे लक्षण होते. मात्र, दशकानुदशके जपलेल्या या नात्यात आणखी एक नवा अध्याय नव्या नेतृत्वाखाली सुरू होत होता. एक वेगळ्या प्रकारची कसोटी मुळात एखादा महान, महाकाय उद्योग उभारणे कठीण असते. मात्र, वारसा म्हणून मिळालेला असा महाकाय उद्योग आणखी कितीतरी पटीने मोठा करणे, ही नेतृत्वाची वेगळ्या प्रकारची कसोटी असते.

२००२ मध्ये धीरूभाई अंबानींचे देहावसान झाले, तेव्हा 'रिलायन्स' आधीच भारतातील सर्वात महत्वाच्या औद्योगिक समूहांपैकी एक होता. अनेकांना तेव्हा वाटले की, धीरूभाईचे उत्तराधिकारी, जे वारसा म्हणून मिळाले त्याचे फार फार तर रक्षण करतील, पण मुकेश अंबानींनी स्वतः साठी एक मोठे ध्येय निश्चित केले. नेहमी मोठा विचार करायचा, मागणीच्या आधी गुंतवणूक करायची आणि संपूर्ण क्षेत्रांना नवा आकार द्यायचा, हे वडिलांचे तत्वज्ञान पुढे न्यायचे, हे ध्येय!

जामनगर: भारत काय निर्माण करू शकतो

या महत्त्वाकांक्षेची सर्वात स्पष्ट अभिव्यक्ती सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर दिसते. मुकेश अंबानीच्या नेतृत्वाखालीच जामनगर जगातील सर्वात मोठे, एकाच ठिकाणी असलेले रिफायनिंग कॉम्पलेक्स - तेलशुद्धीकरण संकुल म्हणून विकसित झाले. या जामनगरमध्येच भारतीय अभियांत्रिकी जागतिकस्तरावरचे काम करते आणि या ठिकाणी आंतरखंडीय बाजारपेठांना ऊर्जा देणाऱ्या इंधनावरही प्रक्रिया केली जाते.

जामनगर हा गुजरातसाठी, केवळ एक औद्योगिक पत्ता नव्हे। गुंतवणुका, रोजगार, कौशल्ये आणि पुरवठादार व सेवा प्रदल्यांची एक परिसंस्था जामनगरने गुजरातमध्ये निर्माण केली. राज्याला जागतिक ऊर्जा नकाशावर अढळ स्थान मिळवून दिले. आज याच प्रदेशात धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिया कॉम्प्लेक्सदेखील आहे, जे भविष्यातील ऊर्जेकडे 'रिलायन्स'च्या वाटचालीचे प्रतीक समजले जाते. रोजच्या जीवनाच्या अधिक जवळ नरोडा येथील टेक्स्टाईल मिलने रिलायन्सला भारतीय घराघरांत नाव मिळवून दिले होते. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली हे नाते कितीतरी पुढे गेले, रिलायन्स रिटेलने सुसंघटित खरेदीचा शॉपिंगचा अनुभव शहरांपासून ते छोट्या गावांपर्यंत पोहोचवला.

त्यापाठोपाठ मीडिया आणि मनोरंजन, डिजिटल सेवा आणि अखेरीस दूरसंचार क्षेत्रही आले. एकाच पिवीत, एका कुटुंबाच्या कपड्यांमधला धागा बनवण्यापासून तर ते कुटुंब काय खरेदी करते, काय पाहते आणि जगाशी कसे जोडले जाते याला स्पर्श करण्यापर्यंत रिलायन्स समूह पोहोचला.

या वैविध्यपूर्ण प्रवासातही धीरूभाईंचाच दृष्टिकोन हा एक समान धागा होता. तो म्हणजे प्रचंड क्षमता असलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे, प्रचलित समजुतींना आव्हान देणे आणि नवीन बाजारपेठा निर्माण करणे.

भारतातला मध्यमवर्ग मोठ्या कंपन्यांच्या औद्योगिक प्रगतीत वाटा उचलू शकतो, हे वडिलांनी दाखवून दिले आणि मुलाने तीच प्रगती जागतिकस्तरावर कशी दिसू शकते, हे दाखयले. म्हणूनय मुकेश अंबानी 'नवयुग गुजरात ना शिल्पी' - म्हणजेच नवयुगातील गुजरातचे शिल्पकार ठरतात.

रिलायन्सच्या या प्रवासात सर्वांत नाट्यमय प्रकरण अजून यायचे होते आणि त्याची सुरुवात बोर्डरूममध्ये नव्हे, तर अंबानी कुटुंबाच्याच जेवणाच्या टेबलावर झाली. एक कहाणी, जी गुजरातने लिहायला मदत केली.

एकट्या कुटुंबाने जामनगर उभे केले नाही. जामनगर उमे राहिले ते गुजरतच्या जमिनीवर, गुजरातच्या किनारपट्टीवर, गुजरातच्या कामगारांवर आणि आपले यश वाटून घेणाऱ्या व्यवसायावरील दृढविश्वासावर . ही भागीदारी प्रत्येक पिढीसोबत वाढत गेली, १९७७ च्या भागधारकांपासून ते आज रिलायन्सच्या जागतिक भरारीला बळ देणाऱ्या समुदायांपर्यंत. गुजरात या कथेचा कधीही केवळ प्रेक्षक नव्हता. आता रिलायन्स समूह पुढच्या अध्यायात प्रवेश करत असताना ज्या राज्याने रिलायन्सची ही कहाणी लिहायला मदत केली होती, त्या राज्याला या नव्या अध्यायातही मानाचे स्थान आहेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT