crime news file photo
राष्ट्रीय

Crime News: पोलीस दलाला हादरवणारी घटना! कॉन्स्टेबलकडून पोलिसाच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून एका पोलिस कॉन्स्टेबलने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

भोपाळ: मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून एका पोलिस कॉन्स्टेबलने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे, नराधम बलात्कार करत असताना त्याचा दुसरा सहकारी पोलीस कर्मचारी बाहेर पहारा देत होता. या घटनेतील पीडित मुलगी ही देखील एका पोलीस कर्मचाऱ्याचीच मुलगी असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

संतोष सेन असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी ही घटना घडली. कॉन्स्टेबल सेन याने एका ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून पीडित मुलीशी संपर्क साधला. आपल्या मुलीचा वाढदिवस आहे, पार्टीला ये, असे सांगितले. संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मुलगी 'लाल परेड ग्राऊंड'जवळ पोहोचली. तेथे संतोष सेन आणि त्याचा सहकारी जितेंद्र राजपूत हे एका कारमध्ये राजपूतच्या तीन वर्षांच्या मुलासह तिची वाट पाहत होते.

संतोषने मुलीचा विश्वास संपादन करून तिला 'एम. पी. नगर' परिसरातील एका घरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. पीडितेला घटनास्थळी आणण्यासाठी वापरण्यात आलेली कार जितेंद्रनेच आणली होती. इतकेच नव्हे, तर संतोष आत अत्याचार करत असताना जितेंद्र आपल्या तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन घराबाहेर पहारा देत उभा होता.

घटनेनंतर पीडित मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला, त्यानंतर तातडीने तक्रार दाखल करण्यात आली. जहांगीराबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजन सिंह अहिरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कमला नगर पोलीस ठाण्यात 'झिरो एफआयआर' नोंदवण्यात आला होता, जो नंतर पुढील तपासासाठी जहांगीराबाद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

पोलीसांनी तातडीने कारवाई करत गुरुवारी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी संतोष सेन याच्यावर 'पोक्सो', भारतीय न्याय संहिता आणि 'अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याचा सहकारी जितेंद्र राजपूत याला गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी आणि सहभाग दर्शवल्याप्रकरणी अटकेत घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT