JP Nadda held a high-level meeting to review the dengue situation
डेंग्यूच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेपी नड्डांनी घेतली उच्चस्तरीय बैठक Pudhari FIle Photo
राष्ट्रीय

देशातील डेंग्यूच्या रुग्णांमधील वाढीमुळे दिल्लीत हालचाली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत डेंग्यूची परिस्थिती, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी तयारीवर बैठकीत चर्चा झाली.

सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांवर आणि प्रदेशांवर लक्ष केंद्रित करावे. जेथे रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे, त्या राज्यात डेंग्यूवर प्रतिबंध करण्यासाठी कार्य करावे. असे निर्देश बैठकीत देण्यात आले. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असलेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीत डेंग्यू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यावर चर्चा झाली.

डेंग्यू प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी 24*7 केंद्रीय हेल्पलाइन क्रमांक तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारनेही हेल्प लाइन क्रमांक सुरू करावेत असे बैठकीत सांगण्यात आले. प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधे आणि इतर संसाधने पूर्णपणे सुसज्ज डेंग्यू वॉर्डांची खात्री करण्यासाठी रुग्णालये तयार ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

SCROLL FOR NEXT