भर पंचायतीत प्रियकरासोबत राहण्याचा पत्‍नीचा हट्ट, पतीने लावले लग्न, मुलांनी घेतला 'हा' निर्णय File Photo
राष्ट्रीय

भर पंचायतीत प्रियकरासोबत राहण्याचा पत्‍नीचा हट्ट, पतीने लावले लग्न, मुलांनी घेतला 'हा' निर्णय

पतीने दोघांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र पंचायतीच्या दरम्यान दोन मुलांची आई तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी अडून बसली.

पुढारी वृत्तसेवा

mother of two children married to her lover husband family shocked

प्रतापगढ : पुढारी ऑनलाईन

सध्याच्या आधुनिक जगात मानवी नातेसंबंधांना तडा जाण्याचे प्रसंग वाढल्याचे दिसून येत आहेत. यामुळे कुटुंब व्यवस्थेवरही दुरगामी परिणाम होत असून याचे परिणाम भावी पिढीवरही होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. कुटुंब व्यवस्थेला धक्का लावणारी अशीच एक घटना समोर आली आहे.

प्रतापगढमध्ये एका महिलेने पतीसमोरच भर पंचायतीत आपल्या प्रेमीसमोर विवाह केल्याची घटना घडली. पतीने दोघांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र पंचायतीच्या दरम्यान दोन मुलांची आई तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी अडून बसली. मग काय पतीच्या समक्षच तीचे दुसरे लग्न लावण्यात आले.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये एक अनोखे आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्याची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. दोन मुलांच्या आईने पंचायतीसमोर आपल्या पतीच्या समक्ष तिच्या प्रियकरासोबत विवाह केल्याची घटना समोर आली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, आसपुर देवसरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत रमगढा गावातल्या आशिष तिवारी या व्यक्तीने शनिवारी रात्री तिच्या पत्‍नीला तीचा पुर्वाश्रमीचा प्रियकर अमित शर्मासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पकडले होते. या घटनेनंतर पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येउन प्रियकराला ताब्यात घेतले.

यानंतर गावात दिवसभर पंचायतीत चर्चा झाली. पंचायतीत पत्‍नी पिंकी आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी अडून राहिली. तीने आपल्या पतीसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. तीला सर्व लोकांनी समजावण्याचा खूप प्रयत्‍न केला, मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती.

पिंकी आणि आशीष तिवारी यांचे लग्न 2016 मध्ये झाले आहे. दोघांना दोन मुले आहेत. ज्यातील एक मुलगा 7 वर्षाचा आहे तर लहान मुलगा 4 वर्षाचा आहे. दरम्यान या दोन्हीही मुलांनी आपल्या आईसोबत जाण्यास नकार दिला. मुलांनी आम्हाला बाबांसोब राहायचे असल्याचे सर्वांसमक्ष सांगितले.

पंचायतीच्या सहमतीनंतर आशीष तिवारीने पत्‍नी पिंकीचे लग्न तिचा प्रेमी अमित शर्मासोबत अमरगढ स्थित प्राचीन शिव मंदिरात लावून दिले. यावेळी दोंन्ही पक्षाचे लोक उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शर्मा हा दिलीपपूर क्षेत्रच्या मीसिद्धीपूर गावचा रहिवासी आहे.

या घटनेनंतर या परिसरात या घटनेवरून चर्चेला उत आला आहे. दरम्यान पिंकी तीच्या प्रेमीसोबत लग्न करून नव्या घरात संसार थाटण्यासाठी निघून गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT