राष्ट्रीय

नवजात बालकाला घेऊन बाप रुग्णालयाबाहेर; कोरोनाबाधित पत्नी बरी होण्याकडे लागले डोळे 

Pudhari News

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी सुरू असलेली रुग्णांची आणि नातेवाईकांची धावाधाव संपता संपत नाही. दुसरीकडे उपचारांअभावी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत तर काहींना कुटुंब सावरता सावरता कोलमडून पडायची वेळ आली आहे. 

तेलंगणा येथे बाळंतपणानंतर आई कोरोनाबाधित आढळल्याने अवघ्या पाच दिवसांच्या बाळाला घेऊन वडील रुग्णालयाच्या दारात बसले आहेत. हे ह्रदयद्रावक चित्र अनेकांचे काळीज हेलावून टाकत आहे. देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या २,४०,४६,८०९ वर पोहोचली आहे. देशात अनेक ठिकाणी आई वडिलांना कोरोनाने गाठल्याने लहान मुलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना नवजात बालकाचा हो फोटो अनेकांना विचलित करत आहे.

वाचा : तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात!

बाळंतपणानंतर आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या बाळाचे संगोपन करण्याची जबाबदारी वडिलांवर आली आहे. तेलंगणातील सिकंदराबादमध्ये पत्नी बरी व्हावी यासाठी पाच दिवसांच्या मुलीला घेऊन पती रुग्णालयाबाहेर वाट पाहत असल्याचे पहायला मिळत आहे. २० वर्षीय कृष्णा आपल्या लहानगीला एका खुर्चीत ठेवून पत्नीच्या बरे होण्याची वाट पाहत आहे. 

नवजात बालकालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून तिला आईपासून लांब ठेवण्यात आले आहे. मुलीची देखभाल करण्यासाठी कृष्णा यांची आई सोबत असून मुलीला दुधाची पावडर पाण्यात टाकून पाजली जात आहे. कृष्णाचे गाव तेलंगाणातील झहिराबाद असून ते हैदराबाद येथून ११५ किलोमीटरवर आहे.  त्यामुळे त्यांनी घरी परतण्याऐवजी रुग्णालयाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

बाळ चोरीला जाण्याची भीती

पत्नीने कोरोनावर मात केल्यानंतर आम्ही सर्वजण घरी जाऊ असा विश्वास कृष्णाला आहे. मात्र, आपली मुलगी कोणी चोरून नेईल, अशी भीतीही त्यांना सतावत आहे. त्यासाठी ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत.

वाचा : 'दिल्ली सरकार कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना करणार मदत'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT