नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दिल्लीतील लोकांना महागाईला समोर जाव लागत आहे. एलपीजी गॅस सिलेंडर पासून दूध, सीएनजी, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेलापर्यंत सगळे महागले आहे. याचा झटका सामान्य जनतेला बसत आहे. अमूल पाठाेपाठ शनिवारी मदर डेअरीनेही दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा : कोरोना : रुग्ण मृत्यू संख्या पुन्हा वाढली
अधिक वाचा : आता ICICI बँकेचा ग्राहकांना मोठा दणका! अनेक नियमांमध्ये मोठे बदल
११ जुलैपासून मदर डेअरीचे दूध २ रुपये प्रतिलीटर महागणार आहे. याअगोदर दीड वर्षांपूर्वी मदर डेअरीने किंमती वाढविल्या होत्या.
१ जुलैपासून अमुलनेही दूधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली होती. पॅकेजिंग खर्चात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे, वाहतुकीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, अस अमुलने निवेदनात म्हटलं हाेते. चीज, लोणी, तूप, लस्सी, आइस्क्रीम आणि ताक याशिवाय चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटच्या किंमतीही वाढू शकतात.
२०१९ मध्ये मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बदललेल्या किंमती रविवारी ११ जुलैपासून लागू होतील. या किंमती दुधाच्या सर्व प्रकारांवर लागू होतील.मदर डेअरीच्या निवेदनात म्हटले की, "कंपनीच्या इनपुट कॉस्टवर महागाईचा बोजा वाढत आहे, जो गेल्या एका वर्षात अनेक पटींनी वाढला आहे. त्यानंतर सध्याच्या साथीच्या काळात दुधाचे उत्पादन कमी झाल्यानेही भर पडली आहे."
हे ही वाचल का : हिंदू-मुस्लीम : मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?