ओवैसींची पीएम मोदी अन् अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका Pudhari photo
राष्ट्रीय

"मोदी अन् केजरीवाल एकाच नाण्याच्या दोन बाजू" : असदुद्दीन ओवैसी

Assduddin Owaisi | दिल्ली विधानसभा प्रचारादरम्यान टीका

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीची लढाई आता तीव्र झाली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीही दिल्लीच्या लढाईत उतरले आहेत. ते विरोधकांवर जोरदार हल्ला करत आहेत. या संदर्भात त्यांनी गुरुवारी सांगितले की, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फारसा फरक नाही आणि ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशा माहितीचे ट्वीट वृत्तसंस्था 'पीटीआय'ने केले आहे.

मोदी-केजरीवाल यांच्यावर हल्ला

ओखला मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारात ते म्हणाले, ' पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल हे भावांसारखे आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.' दोघेही आरएसएसच्या विचारसरणीतून उदयास आले आहेत. एक त्याच्या शाखांमधून आणि दुसरा त्याच्या संस्थांमधून ओवैसी असे म्हटले आहे. यानंतर ओवैसी यांनी शाहीन बागेत पदयात्रा काढली आणि 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्ह पतंगाचे बटण दाबण्याचे आवाहन लोकांना केले.

केजरीवालांनी एकही विकासकाम केले नाही

ओवैसी म्हणाले, "आम्ही शिफा उर रहमान यांच्या प्रचारासाठी आलो आहोत. आम्ही याआधीही ओखला येथे विधानसभा निवडणूक लढवली आहे. पण, यावेळी वातावरण वेगळे आहे. केजरीवाल यांच्या आमदाराने गेल्या 10 वर्षांत येथे एकही विकासकाम केलेले नाही. त्यामुळे येथील लोक खूप संतप्त आहेत. सरकारने शिफा उर रहमान आणि ताहिर हुसेन यांच्यावर चुकीचा अत्याचार केला आहे. दोघांनाही अनावश्यकपणे तुरुंगात टाकण्यात आले आहे. येथील लोक त्यांच्या मतांद्वारे उत्तर देतील.

6 महिने तुरुंगात राहून आले

केजरीवाल म्हणत आहेत की जर त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर "मला मतदान करू नका". यावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, केजरीवाल सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर आले आहेत. केजरीवाल यांनी सहा महिने तुरुंगात का गेले हे स्पष्ट करावे. दारू घोटाळ्यामुळे ते सहा महिने तुरुंगात राहिला हे सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री असूनही ते तुरुंगात गेले. त्यांना लाज वाटली पाहिजे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिल्लीतील निवडणूक रॅलीबद्दल त्यांनी सांगितले की, योगींच्या रॅलीशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते फक्त एवढेच म्हणू शकतात की ओखला आणि मुस्तफाबादमध्ये लोक एआयएमआयएम उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान करतील आणि त्याला विजयी करतील. एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेनला मुस्तफाबादमधून तिकीट दिले आहे. दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT