Crime News :
एका मुलाचा मृतदेह मिळाल्यावर संतप्त झालेल्या जमावानं एका संशयीत दांपत्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्या जोडप्याचा मृत्यू झाला. ही घटना पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील निश्चितपुर इथं घडली. या प्रकरणानंतर शनिवारी सकाळी या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाची हत्या झाली होती. स्वर्णाभ मंडल हा शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होता. जमावाला या मुलाची हत्या एका जोडप्यानं केली असल्याचा संशय होता. शनिवारी सकाळी या मुलाचा मृतदेह तवालाच्या काठी आढळून आला. मुलाचा मृतदेह एका ताडपत्री मध्ये गुंडाळलेला होता.
दरम्यान, मृत मुलाच्या कुटुंबियांनी मुलाची हत्या ही या जोडप्यानं केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय आणि जमावानं कथीत आरोपीच्या घरावर हल्ला केला. संपत्तीचं मोठं नुकसान केलं अन् त्यानंतर जोडप्यावर देखील हल्ला केला.
जमावाच्या या मारहाणीत हे जोडपं गंभीर जखमी झालं. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यावर तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आल. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'प्राथमिक तपासात मृत मुलगा शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मैदानावर खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यानंतर कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मुलगा कुठंच मिळत नाही म्हटल्यावर कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रार पोलीसात दाखल केली.
यानंतर पोलीसांनी रात्रभर या मुलाचा तपास केली. दरम्यान, या मुलाचा मृतदेह तलावात आढळून आला. स्थानिक लोकांनी तलावाच्या जवळ राहणाऱ्या एका दांपत्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर या जमावानं या जोडप्याच्या घरावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पल गया बिस्वास आणि सोमा बिस्वास या जोडप्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला. जमावानं या जोडप्याला घरातून ओढत बाहेर आणलं. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी या दांपत्याला रूग्णालयात दाखल केलं. मात्र तिथं या दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मृत मुलाच्या कुटुंबियांचा आणि या बिस्वास दांपत्याचा कौटुंबिक वाद होता. पोलिसांनी या भागातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत. या भागात राहणाऱ्या अनेक लोकांवर या जमावाच्या मारहाणीत सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितलं की सध्या स्थिती नियंत्रणात आहे. सध्या तरी कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र य प्रकरणाचा तपास सुरू आहे.