पुढारी ऑनलाईन डेस्क : 'घटनात्मकदृष्ट्या महिलांना पुरूषांइतकेच अधिकार आहेत. वैवाहिक वाद आणि मतभेद प्रकरणात महिलाच छळ आणि क्रूरतेला सर्वाधिक बळी पडतात हे खरं आहे;पण वैवाहिक वादात पुरुषही महिलांकडून होणाऱ्या क्रूरतेचे बळी ठरतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आज लिंगनिरपेक्ष समाजाची गरज आहे, असे निरीक्षण नुकतेच कनार्टक उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच घटस्फोट प्रकरणाचा खटला हस्तांतरित करण्याची पत्नीची मागणीही न्यायालयाने फेटाळली.
दाम्पत्याला दोन मुलं आहेत. मागील काही दिवसांपासून पती-पत्नी विभक्त राहत आहेत. दोन्ही मुलांचा संभाळ पती करत आहे. घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सध्या चिकमंगलूर न्यायालयात सुरु आहे. आपण चिकमंगलूरपासून १३० किलोमीटर अंतरावर राहण्यास आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी दरवेळी तिथे जाणे कठीण आहे. त्यामुळे खटला शिवमोगा जिल्ह्यातील न्यायालयात हस्तांतरित करावा, अशी मागणी करणारी याचिका पत्नीने कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती.
पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर ७ जानेवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सी. सुमलता यांच्या एकल खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने खटला हस्तांतरित करण्याची मागणी फेटाळली.
न्यायमूर्ती सी. सुमलता यांनी स्पष्ट केली की, या प्रकरणातील महिलेला १३० किलोमीटर प्रवास करुन खटल्यास हजर राहणे हे गैरसोयीचे होत आहे हे खरे आहे; पण हा खटला अन्य ठिकाणी हस्तांतरित केल्यास पतीला आणखी त्रास होईल. पतीसाठी हे विशेषतः कठीण असेल कारण तो दोन अल्पवयीन मुलांची काळजी घेत आहे. आपल्या अल्पवयीन मुलांना सोडून दूर प्रवास करणे हे पतीसाठी कठीण होईल. घटनात्मकदृष्ट्या, महिलेला पुरूषांइतकेच अधिकार आहेत. पण सत्य हे आहे की विवाहाशी संबंधित वादांमध्ये महिलांना छळ आणि क्रूरतेला जास्त बळी पडतात. शिवाय, पुरुषही महिलांकडून होणाऱ्या क्रूरतेचे बळी ठरतात ही वस्तुस्थिती देखील आहे. म्हणूनच आज लिंगनिरपेक्ष समाजाची गरज आहे. अशा समाजाची गरज आहे जिथे लिंगभेदाव्यतिरिक्त इतर मुद्द्यांकडे पाहिले जाऊ शकेल.

Men too affected by cruelty of women in marital disputes: Karnataka High Court

Read full story: https://t.co/fGxzsXN9go pic.twitter.com/cLqTLb6mxR
— Bar and Bench (@barandbench) January 21, 2025