पतीचा मृतदेह ड्रममध्ये टाकून सिमेंटने भरला.... File Photo
राष्ट्रीय

पतीचा मृतदेह ड्रममध्ये टाकून सिमेंटने भरला अन् प्रियकरासाेबत मिळून पत्नीने दिला...

धक्‍कादायक प्रकरण असे आले समाेर...

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

समाजात वाढत चाललेला स्‍वैराचार, स्‍वार्थी वृत्ती यामुळे माणुसकीच्या नात्‍यांनाही काळीमा फासण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. एका घरात सिमेंटने भरलेल्‍या ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे असल्‍याची बातमी समोर आली आणि एकच गोंधळ उडाला. मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरी करणाऱ्या सौरभ राजपूत या व्यक्‍तीच्या हत्‍येप्रकरणी कोणा दुसऱ्या व्यक्‍तीला नाही तर त्‍याची पत्‍नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

ड्रममध्ये टाकले मृतदेहाचे तुकडे अन् वरून सिमेंट भरले.....

सौरभच्या पत्‍नीने आपल्‍या बॉयफ्रेंडसोबत मिळून आपल्‍या पतीची हत्‍या केली. यानंतर त्‍याच्या मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर एका प्लास्‍टिकच्या ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे टाकून त्‍यावर सिमेंटचे मिश्रण ओतून पूर्ण ड्रम भरण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्‍यात घेवून त्‍यांची चौकशी केली तेंव्हा हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी तब्‍बल २ तासांच्या अथक प्रयत्‍नानंतरही ड्रम उघडला नाही, तेंव्हा पोलिसांनी हा ड्रम ताब्‍यात घेत पोस्‍टमार्टमसाठी पाठवला. त्‍या ठिकाणी हा ड्रम कापून त्‍यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. असे सांगण्यात येत आहे की, सीमेंट घट्ट झाल्‍याने मृतदेहही त्‍यामध्ये घट्ट बसला होता. या घटनेची माहिती परिसरात समजताच मृताच्या घराजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली.

कुटुंबियांचा विराेध पत्‍करून प्रेमविवाह, ५ वर्षांची मुलगीही आहे

ही घटना मेरठच्या ब्रह्मपुरी ठाण्याच्या परिसरातील आहे. येथील इंदिरानगरमध्ये मर्चेंट नेव्हीमध्ये असलेले सौरभ राजपूत आपली पत्‍नी मुस्‍कार रस्‍तोगी आणि ५ वर्षांच्या मुलीसह राहत होते. सध्या त्‍यांची पोस्‍टींग लंडनला होती. असेही सांगण्यात येत आहे की, सौरभ काही दिवसांपूर्वीच लंडनहून मेरठला आले होते. सौरभ कुमार यांनी २०१६ मध्ये प्रेम विवाह केला होता. त्‍यामुळे कुटुंबियांसोबत त्‍यांच्यामध्ये वितुष्‍ट आले होते. त्‍यामुळे गेल्‍या तीन वर्षांपासून ते आपली पत्‍नी मुस्‍कान आणि मुलीसह इंदिरानगर येथील भाड्याच्या घरात राहत होते.

गल्‍लीतल्‍या नागरिकांना सांगत होती भलतेच

४ मार्च रोजी सौरभ मेरठला आले होते. त्‍याच्या १० दिवस आधी गल्‍लीमधील लोकांना मुस्‍काने आपण नवऱ्यासोबत हिमाचल प्रेदशला जाणार असल्‍याचे सांगितले होते. यानंतर घराला कुलूप लावण्यात आले. यानंतर कोणीही सौरभ किंवा मुस्‍कानला पाहिले नाही. यानंतर सर्व घटनाक्रम मुस्‍कानने आपल्‍या आईला सांगितला की कशाप्रकारे तीने आणि तिच्या प्रियकराने मिळून सौरभची हत्‍या केली. यानंतर मुस्‍कानची आई पोलिस स्‍टेशनला गेली आणि आपल्‍या लेकीने केलेल्‍या प्रकाराची सारी माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी मुस्‍कानला घेतले ताब्‍यात

पोलिसांनी मुस्‍कानला ताब्‍यात घेउन चौकशी केली तेंव्हा पूर्ण प्रकरण समोर आले. मुस्‍कानने प्रियकरासोबत मिळून सौरभची हत्‍या करून तो ड्रममध्ये टाकून तो सीमेंटने भरला. कोणालाही समजू नये यासाठी दोघांनी शांत डोक्‍याने ही हत्‍या करून तीची विल्‍हेवाट लावली होती. तसेच हे प्रकरण बाहेर येउ नये यासाठी तो ड्रम घराच्या आतच लपवून ठेवला होता.

मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम यांनी सांगितले की, सायंकाळी ब्रह्मपुरी पोलिसांना इंदिरा नगरमध्ये एका हत्‍येची माहिती मिळाली होती. सूचनेच्या आधारावरून पोलिसांनी घटनास्‍थळी जाउन तपास करून चौकशी केली. तेंव्हा पोलिसांना माहिती मिळाली की, सौरभ राजपूत मर्चेंट नेव्हीमध्ये काम करत होते. ते ४ तारखेला आपल्‍या घरी आले होते, त्‍यानंतर ते गायब झाले.

चाकूने भोसकून केली हत्‍या, सिमेंटच्या मिश्रणात घातला मृतदेह

संशयाच्या आधारे पोलिसांनी त्‍यांची पत्‍नी मुस्‍कान आणि प्रेमी साहिलला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले. तेंव्हा चौकशीवेळी त्‍यांनी कबूल केले की, ४ तारखेला मुस्‍कानने तीचा प्रियकर साहिलसोबत चाकू मारून सौरभची हत्‍या केली. हत्‍येनंतर या दोघांनी मिळून मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे ड्रममध्ये टाकले आणि त्‍यावर सीमेट कालवून सीमेंटने ड्रम भरला. पोलिसांनी या माहितीवरून मृतदेहाचा ड्रम ताब्‍यात घेतला. पोर्स्टमार्टमसाठी मृतदेह मोर्चरी येथे पाठवण्यात आला. यानंरत मुस्‍कान आणि साहिल या दोघांना अटक करण्यात आली. त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT