मेरठमधील गाजलेल्या हत्याकांडप्रकरणी तुरुंगात असलेली आरोपी मुस्कान आता लवकरच आई होणार आहे. तिचा प्रेग्नंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामुळे आता संपूर्ण प्रकरणात एक वेगळच वळण निर्माण झाले आहे.
Muskan Rastogi Pregnant News
मुस्कानला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती आणि ती सध्या जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. अलीकडे तिला त्रास होत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं, दरम्यान ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. रिपोर्टमध्ये तिची गर्भावस्था स्पष्ट झाली असून सध्या तीला आरोग्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे.
मेरठमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात मुस्कानला आरोपी ठरवण्यात आलं होतं. सौरभ राजपूत, मर्चंट नेव्हीतील माजी अधिकारी, यांची हत्या ४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केल्याचा आरोप आहे.
दोघांनी मिळून सौरभ यांना गुंगीचे औषध देऊन, चाकूने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सीमेंटने भरलेल्या ड्रममध्ये लपवले. या प्रकरणी ती गेल्या काही काळापासून तुरुंगात आहे. आता तिच्या गर्भावस्थेची माहिती समोर आल्यानंतर, ही गर्भधारणा तुरुंगात झाली की अटकेपूर्वी याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.
या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात रिपोर्ट सादर केला असून, मुस्कानच्या आरोग्याची काळजी घेत तुरुंग प्रशासनाने विशेष वैद्यकीय सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे. गर्भवती कैद्यांच्या बाबतीत कायद्यानुसार विशिष्ट अधिकार आणि सुविधा दिल्या जातात.