Medical Advertisement | वैद्यकीय जाहिरातींना आता लगाम; ‘हमखास उपचारां’च्या दाव्यांवर बंदी! 
राष्ट्रीय

Medical Advertisement | वैद्यकीय जाहिरातींना आता लगाम; ‘हमखास उपचारां’च्या दाव्यांवर बंदी!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली प्रसार आणि समाजमाध्यमांवर रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या आणि आश्वासने देणाऱ्या जाहिरातींवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) चाप लावला आहे. हमखास उपचारांच्या नावाने दावा करणाऱ्या रुग्णालये, क्लिनिक आणि नोंदणीकृत डॉक्टरांच्या जाहिराती व सार्वजनिक संवादासाठी नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या डॉक्टरांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

आयोगाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण रोखणे, रुग्णांची फसवणूक टाळणे आणि उपचारांविषयी पारदर्शकता राखणे, हा या नियमांचा उद्देश आहे. मार्गदर्शक तत्त्वे तातडीने लागू करण्यात आली आहेत. नव्या नियमांनुसार, स्वतःला सर्वोत्तम किंवा क्रमांक एक डॉक्टर ठरवणे, उपचारांद्वारे हमखास बरे करण्याची हमी देणे तसेच रुग्णांच्या प्रशस्तिपत्रांचा किंवा उपचारांपूर्वीच्या आणि नंतरच्या छायाचित्रांचा जाहिरातींसाठी वापर करणे, यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT