MBA Student Death Case | एमबीए विद्यार्थिनीचा मृतदेह वर्गमित्राच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत Pudhari Photo
राष्ट्रीय

MBA Student Death Case | एमबीए विद्यार्थिनीचा मृतदेह वर्गमित्राच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत

पुढारी वृत्तसेवा

इंदूर : एमबीए विद्यार्थिनीचा मृतदेह वर्गमित्राच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. द्वारकापुरी परिसरातील अंकली गल्ली येथे पीयूष धनोतिया या तिच्या वर्गमित्राच्या भाड्याच्या खोलीत विद्यार्थिनीचा मृतदेह निर्वस्त्र आणि संशयास्पद अवस्थेत आढला. मंगळवारी (दि. 10) आधार कार्ड दुरुस्तीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेली ही तरुणी बेपत्ता होती.

त्याच रात्री तिच्या कॉलेजच्या अधिकृत व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर तिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये संशयित आरोपीने स्वतःचा चेहरा इमोजीने लपवला होता; मात्र तरुणीची ओळख स्पष्ट दिसत होती. हा व्हिडीओ केवळ ग्रुपवरच नाही, तर तरुणीचा मोबाईल वापरून तिच्या स्टेटसवर आणि संपर्कातील इतर लोकांनाही पाठवण्यात आला होता. या गंभीर प्रकारामुळे कुटुंबीय चिंतेत असतानाच आता तिचा मृतदेह सापडल्याने एकच गोंधळ उडाला.

ही घटना अंकल गली येथे घडली. पोलिसांना माहिती मिळताच एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. ज्या खोलीत मृतदेह आढळला तो मंदसौर येथील रहिवासी पीयूष धामनोदियाचा होता, त्‍याने ती खोली भाड्याने घेतली होती. दोघेही सनवेर रोडवरील एका संस्थेत दुसऱ्या सत्रातील एमबीए पदवी घेत होते. घटनेपासून पीयूष बेपत्ता आहे. विद्यार्थीनीने सांगितले होते की ती एका वर्गमित्रासह वाढदिवसाच्या पार्टीला जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT