कोची : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील कण्णापूरम येथे शुक्रवारी रात्री एका भाड्याच्या घरात बॉम्ब बनवताना झालेल्या शक्तिशाली स्फोटात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण घर जमीनदोस्त झाले असून, मृताच्या शरीराचे तुकडे परिसरात विखुरले गेले. पोलिसांनी हा स्फोट देशी बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे.
किझारा परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. आजूबाजूच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आणि दरवाजे तुटले. याप्रकरणी पोलिसांनी अनुप मलिकवर स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.