प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

भयंकर..! रक्‍ताने माखलेल्‍या हाताने 'तो' पोलीस ठाण्‍यात गेला..त्‍याचा गुन्‍हा ऐकताच पोलीसही हादरले

केरळमधील वेंजरमुडू येथे आरोपीने केली प्रेयसीसह पाच जणांची हत्‍या

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एक तरुण रक्‍ताने माखलेला हाताने पोलीस ठाण्‍यात येतो.... प्रेयसीसह पाच जणांची हत्‍या केल्‍याची तो अत्‍यंत शांतपणे पाेलिसांसमाेर कबुली देतो.... या माहिती ऐकताच संपूर्ण पोलीस ठाणे हादरते.... घटनास्‍थळी धाव घेण्‍यासाठी पाेलीस आपली वाहने काढतात.... पोलिस स्टेशनच्या फोनच्या घंटा वाजू लागतात... वायरलेसवर अलर्ट येऊ लागतो... हा प्रसंग कोणत्‍याही वेब सीरिज किंवा दाक्षिणात्‍य चित्रपटातील नाही तर वास्‍तवात केरळमधील वेंजरमुडू येथे सोमवारी सायंकाळी घडला. एकाचवेळी पाच जणांच्‍या हत्‍येच्‍या घटनेने संपूर्ण केरळ हादरले आहे. (Mass murder in Kerala )

पाच जणांची हत्‍या, आईला ठार मारण्‍याचा प्रयत्‍न

मनोरमा न्यूजनुसार, पेरुमला येथील रहिवासी असणार्‍या २३ वर्षी आरोपी अफान याने पोलिसांना माहिती दिली की, पोलिसांनी सांगितले की, आरोपीने प्रथम सोमवारी (दि.२४) दुपारी तीन वाजता पानगोदे येथील तिच्या घरी त्याची आजी सलमा बीवी (८८) यांची हत्या केली. त्यानंतर तो पानगोदेपासून सुमारे १६ किमी अंतरावर असलेल्या कुननवेंगाजवळील एसएन पुरम येथे त्याचे काका अब्दुल लतीफ (५८) यांच्या घरी पोहोचला. काकाअब्दुल लतीफ आणि त्याची पत्नी शाहिदा बीवी (५४) यांची हत्या केली. त्यानंतर अफान पुल्लमपारा जवळील पेरुमला येथे घरी परतला. येथे त्याने त्याची आई, भाऊ अफझान (१४) आणि प्रेयसी फरशाना (१९) यांच्यावर हल्ला केला. यामध्‍ये भाउ आणि प्रेयसी जागीच ठार झाले तर आई गंभीर झाली. गुन्हा केल्यानंतर अफा थेट रिक्षाने वेंजरमुडू पोलिस ठाण्यात गेला. येथे त्‍याने सहा जणांची हत्‍या केल्‍याची कबुली दिली.

पाेलिसांनी घेतले पाच मृतदेह ताब्‍यात

अफान याने पोलिसांना दिलेल्‍या माहिती म्‍हटलं आहे की, त्याने तीन वेगवेगळ्या घरात त्याची आई, भाऊ, काका, काकू, मैत्रीण आणि आजी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत पाच मृतदेह ताब्‍यात घेतले. अफानच्‍या आईवर सध्या गोकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्‍या सध्‍या कर्करोगाशी झुंज देत असून. त्‍यांची प्रकृती गंभीर असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

आराेपी अफानने हत्‍यामागील कारणही सांगितले

अफान आणि अफझान त्यांचे वडील रहीम यांच्यासोबत आखाती देशात होते.आरोपी अफानने पोलिसांना सांगितले की, "आखाती देशात त्याच्या व्यवसायात माेठा तोटा झाला. मोठे कर्ज फेडण्‍यास कुटुंब हतबल हाेते. म्हणून त्याने कुटुंबातील सहा सदस्यांची हत्या केली." मात्र पोलिसांना अफानच्‍या म्हणण्यावर शंका आहे. अधिक तपशील शोधण्यासाठी ते सखोल चौकशी करत आहेत. आरोपी अफानला अमली पदार्थाचे व्यसन आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याचे मोबाईल फोन आणि कॉल डिटेल्स तपासले जात असल्‍याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आरोपीने केले जीवन संपविण्‍याचा प्रयत्‍न

पोलीस ठाण्‍यात जाण्‍यापूर्वी आरोप अफानने विष प्राशन केले होते. चौकशीदरम्यान त्याची प्रकृती बिघडली तेव्हा पोलिसांनी त्याला तिरुअनंतपुरम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले आहे. याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT