शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Pudhari photo
राष्ट्रीय

शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सैन्यदल आणि पोलीसांतर्फे बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना

पुढारी वृत्तसेवा

अकोला, पुढारी वृत्तसेवा : मोरगाव भाकरे येथील शहिद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर सोमवारी (दि.8) त्याच्या मुळगावी राजशिष्टाचारानुसार आणि बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. सैनिकांचे गाव म्हणुन मोरगांव भाकरे गावाची ओळख असून येथे आजवर 90 युवक सैन्यात भरती झालेले आहेत.शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘शहिद प्रवीण जंजाळ अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT