राष्ट्रीय

Manipur violence: मणिपुरात सरकारी निर्बंधांमुळे पुन्हा हिंसाचार

मोनिका क्षीरसागर

इंफाळ; पीटीआय: मणिपूरमध्ये कुकीविरुद्ध मैतेई संघर्ष पुन्हा उफाळला असून, संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी बुधवारी रबरी गोळ्या झाडल्या. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत.

चुराचंदपूर जिल्हा कुकीबहुल म्हणून, तर बिष्णुपूर जिल्हा मैतेईबहुल म्हणून ओळखला जातो. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून लाकडी अडथळे उभारले आहेत. पोलिसांच्या या कृतीला दोन्ही समाजांनी विरोध केला आणि संचारबंदीचे उल्लंघन करून लाकडी अडथळे पाडून टाकले. दरम्यान, जखमी आंदोलकांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT