पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांनी गुरुवारी बंडखोरांना बेकायदेशीर व लूटलेली हत्यारे परत करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. गेली दोन वर्षे मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पहिल्यांदाच असे आदेश दिले आहेत.
मैतेयी व कुकी समाजामध्ये गेली दोन वर्षे संघर्ष सुरु आहे. त्या अनेक ठिकाणी मानवी हक्कांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीचा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. नुकताच तेथील मुख्यमंत्र्यांनी राजिनामा दिला आहे.
‘मी राज्यातील सर्व समुदायाच्या जनतेला विषेशःता युवकांना व डोंगरी भागातील लोकांना आवाहन करत आहे की त्यांनी पुढे येऊन हिंसाचारावेळी लुटलेली हत्यारे जवळच्या पोलिस स्टेशन, तसेच सुरक्षा दलांच्या कॅम्पमध्ये जमा करावी. पुढील सात दिवस यासाठी मुदत असेल. उद्यापासून हत्यारे जमा करण्यास सुरवात होईल. सात दिवसानंतर ज्यांच्याकडे हत्यार सापडेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. असे राज्यपाल अजय भल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.