FLIGHT SAFETY THREAT File Photo
राष्ट्रीय

FLIGHT SAFETY THREAT : विमान हवेत असतानाच 'एमर्जन्सी एक्झिट' उघडण्याचा प्रयत्न; माथेफिरु प्रवाशाचा कोची विमानतळावर राडा

प्रवासी व केबिन क्रूला धमकावून एमर्जन्सी एक्झिटच्या काचेच्या पॅनेलचेही नुकसान

पुढारी वृत्तसेवा

FLIGHT SAFETY THREAT : कुआलालंपुरवरून कोचीकडे येणाऱ्या विमानात एका प्रवाशाने हवेत असतानाच एमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित प्रवाशाला गुरुवारी सकाळी कोची विमानतळावर उतरताच अटक केली आहे. आरोपीने इतर प्रवासी व केबिन क्रूला धमकावून एमर्जन्सी एक्झिटच्या काचेच्या पॅनेलचेही नुकसान केले आहे.

विमान हवेत असताना थरार

जमशीर अथानिक्कल असे या अटकेतील प्रवाशाचे नाव असून, तो बुधवारी कुआलालंपुरहून कोचीला येणाऱ्या 'बाटिक एअर'च्या OD231 या फ्लाईटमधून प्रवास करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार विमान हवेत असताना रात्री ९:३० ते ११:०५ च्या सुमारास घडला.विमानात प्रवाशाने अचानक एमर्जन्सी एक्झिट जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला आणि खिडकीच्या काचेचे नुकसान केले.

सहप्रवाशांना धमकावले

जमशीर अथानिक्कल याने सहप्रवाशांना धमकावून सर्वांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप एफआयआर (FIR) मध्ये करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केबिन क्रूने तातडीने मध्यस्थी करत या प्रवाशाला रोखले.

विमातळावर उतरताच अटक

याप्रकरणी पोलिसांनी संबंधित प्रवाशाला आज (दि. ६) सकाळी कोची विमानतळावर उतरताच अटक केली आहे. नेडूंबसेरी (कोची) पोलिसांनी बाटिक एअरच्या सुरक्षा प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता' (BNS) कलम ३५१(३) अंतर्गत गुन्हेगारी धमकी देणे, 'विमान कायदा' (Air Craft Act) कलम ११A च्या नियमांचे उल्लंघन करणे आणि 'केरळ पोलीस कायदा' कलम ११८(e) नुसार सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT