Smoking Cigarette on Flight: Pudhari
राष्ट्रीय

विमानात 'बिडी जलाईले...'; गुजराती प्रवाशाला उतरवले...

Smoking Cigarette on Flight: एअरहोस्टेसला स्वच्छतागृहातून धुराचा वास आला अन्‌ पोलिसांनी केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Smoking Cigarette on Flight: विमानप्रवासात काही आचारसंहिता पाळणे बंधनकारक असते. त्यापैकीच एक म्हणजे सार्वजनिक विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना सिगारेट-बिडी पिता येत नाही.

पण, तरीही कुणाच्या नकळत बिडी पिणाऱ्या एका गुजराती प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टेकऑफपुर्वीच ही बाब लक्षात आल्यानंतर त्या प्र‍वाशाला विमानातून बाहेर काढण्यात आले. (Man caught smoking beedi on Surat-Kolkata flight)

सूरत-कोलकाता फ्लाईटमधील प्रकार

सूरत-कोलकाता फ्लाईटमध्ये गुरूवारी दुपारी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान दुपारी 4.35 वाजता उड्डाण करण्यास तयार होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला विलंब झाला.

सुमारे 5.30 वाजता, एअर होस्टेसला धुराचा वास आला आणि तिने तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी तत्काळ तपासणी सुरू केली. यावेळी तपासणीत अशोक बिश्वास या प्रवाशाकडे बिडी आणि माचिस आढळून आली. बिश्वास 15A सीटवर बसलेला होता. अशोक बिश्वास याने टेकऑफपूर्वीच विमानाच्या स्वच्छतागृहात बिडी ओढली.

तो मूळचा पश्चिम बंगालमधील असला तरी कामानिमित्त नोकरीसाठी गुजरातच्या नवसारी येथे वास्तव्यास आहे. त्याच्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी BNS च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासणी होऊनही बीडी-माचिस विमानात घेऊन जाण्यात यशस्वी

विमानतळावर कडक सुरक्षा तपासणी होऊनही बिश्वास बीडी आणि माचिस विमानात घेऊन जाण्यात यशस्वी झाला होता. तांत्रिक बिघाडामुळे विमान वेळेवर उड्डाण करू शकले नाही. याचदरम्यान, एअर होस्टेसला स्वच्छतागृहात धुराचा वास घेतला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

बिश्वासला विमानातून उतरवण्यात आले. एअरलाईनने हा प्रकार पोलिसांना कळवला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या एअरलाईनकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही, मात्र त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT