Mamata Banerjee updated X bio May 2026 Pudhari
राष्ट्रीय

Mamata Banerjee X bio update | ममता बॅनर्जींनी अखेर पराभव केला मान्‍य! X वरील अपडेट 'बायो'मुळे मोठी चर्चा...

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राजीनाम्‍यास दिला होता नकार

पुढारी वृत्तसेवा

Mamata Banerjee X bio update

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपल्या 'X' वरील प्रोफाईलमध्ये बदल केला असून, आता तिथे "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (१५ वी, १६ वी आणि १७ वी विधानसभा)" असे लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध पराभव झाल्यानंतर पद सोडण्यास नकार दिला असतानाच, काही दिवसांतच त्यांनी हा बदल केला आहे.

X वरील 'बायो'त काय अपटेड केले?

ममता बॅनर्जी यांनी अपडेट केलेल्या बायोमध्ये आता लिहिले आहे की, "संस्थापक अध्यक्षा, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (१५ वी, १६ वी आणि १७ वी विधानसभा)." यापूर्वी तिथे फक्त "संस्थापक अध्यक्षा, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. माननीय मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल" असे लिहिलेले होते.

राजीनाम्याचा प्रश्नच नाही.. : काय म्‍हणाल्‍या होत्‍या ममता बॅनर्जी?

२०२६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. "आम्ही निवडणूक हरलो नाही," असा ठाम पवित्रा घेत त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फेरफार, हिंसाचार आणि संस्थात्मक पक्षपाताचा आरोप केला."माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजीनामा देणार नाही. आम्ही निवडणूक हरलो नाही," असे बॅनर्जी म्हणाल्या. तसेच, आपल्या पक्षाने खरे तर "नैतिक विजय" मिळवला असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

राज्‍यपालांनी केली प. बंगाल विधानसभा बरखास्‍त

ममता बॅनर्जी यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देण्‍यास नकार दिल्‍यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मोठे पाऊल उचलले. त्यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७४ (२) मधील उप-कलम अन्वये प्राप्त असलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून पश्चिम बंगाल विधानसभा भंग करण्याचे आदेश दिले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ

पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी आज (दि. ९ मे) शपथ घेतली. राज्यपाल आर. एन. रवी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सुवेंदू अधिकारी हे स्वातंत्र्यानंतरचे पश्चिम बंगालचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT