Mamata Banerjee Vs ED In Court Room: तृणमूल काँग्रेसची राजकीय सल्लागार संस्था I-PAC वर इडीने छापेमारी केल्यानंतर कोलकात्या रस्त्यांवर ममता बॅनर्जी विरूद्ध इडी असा सामना पहावयास मिळाला होता. पश्चिम बंगालमध्ये या रेडविरूद्ध तृणमूल काँग्रेसने मोठा मोर्चा काढला होता. आता हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात पोहचलं आहे.
मात्र रस्त्यावरचा गोंधळ कोर्ट रूममध्ये देखील दाखल झाला. त्यामुळं जस्टिस सुव्रा घोष यांनी दाखल झालेल्या दोन्ही बाजूंच्या याचिकांची सुनावणीच पुढं ढकलली. आता ही सुनावणी १४ जानेवारी रोजी होणार आहे. घोष यांनी यावेळी कार्टरूममधील डिस्टर्बन्स आणि गोंधळ यामुळं ही सुनावणी पुढे ढकलत असल्याचं सांगितलं.
पश्चिम बंगाल सरकार आणि इडी यांनी परस्परविरोधी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी जज घोष यांनी सतात्याने ऑर्डर ऑर्डर अशी विनंती केली. मात्र दोन्ही पक्षांच्या वकिलांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. दोन्ही पक्षांचे वकील हे एकमेकांवर ओरडत होते. त्यानंतर जज घोष यांनी सुनावणी स्थगित करत कोर्टरूममधून बाहेर जाणंच पसंत केलं.
जस्टिस घोष यांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये त्यांनी स्केड्युलप्रमाणे दोन्ही पक्षांची सुनावणी आज होणं अपेक्षित होतं. मात्र वकिलांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला. कोर्टाचा डेकोरम आणि मान राखा असं सातत्यानं सांगण्यात आलं. मात्र कान बहिरे झाल्यानंतर तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. कोर्टातील वातावरण सुनावणी पुढे सुरू ठेवण्यायोग्य नव्हतं अशी टिप्पणी केली आहे.
इडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या I-PAC च्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करत आहेत असं म्हणत सर्वात आधी न्यायलयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी तातडीची सुनावणी घेण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर लगेचच चीफ जस्टीस सुजॉय पॉल यांनी ही याचिका फेटाळून लावत ही सुनावणी तातडीनं घेण्याचं कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
त्यानंतर यावर सुनावणी घेण्यासाठी जजची नियुक्ती करण्यात आली अन् एक तारीख निश्चित करण्यात यावी असं सांगण्यात आलं. याचवेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील इडीविरूद्ध डिजीटल डिव्हाईस आणि इतर पुरावे चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेतले असून त्याची चोरी केली असल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. ममता बॅनर्जी यांच्या वतीने याचिकेत ईडी ही भाजपचा हस्तक असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी तृणमूल काँग्रेसचा निवडणूक डेटा चोरी करण्यासाठी ही रेड टाकली असल्याचा आरोप केला.
दरम्यान, दोन्ही पक्षांच्या याचिकेवर सुनावणी दुपारी २.३० मिनिटांनी घेण्याचे निश्चित करण्यात आलं. मात्र इडी काऊन्सील त्रिवेदी आणि तृणमूल काँग्रेसचे कल्यान बॅनर्जी यांनी ते गोंधळामुळं बेंचपर्यंत पोहचू शकत नाहीयेत अशी तक्रार केली. त्यावेळी जस्टीस घोष यांनी जे केसशी निगडीत नाहीयेत त्यांनी कोर्ट रूम सोडून जा अशी सतत विनंती केली. मात्र १५ मिनिटे गोंधळ तसाच सुरू राहिला. शेवटी जस्टीस घोष यांनी मला काही ऐकू येत नाहीये असं म्हणत सुनावणी स्थगित केली.