Delhi Restaurant Fire Case | जीव वाचविण्यासाठी आले अन्‌ जीव गमावून बसले 
राष्ट्रीय

Delhi Restaurant Fire Case | जीव वाचविण्यासाठी आले अन्‌ जीव गमावून बसले; १८ परदेशी नागरिकांवर घाला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या मालवीयनगरमधील एका हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १८ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. हे विदेशी नागरिक वैद्यकीय उपचार आणि पर्यटनासाठी भारतात आले होते. आपला देश सोडून उपचार घेऊन जीव वाचविण्यासाठी आलेल्या यातील बहुतांशी नागरिकांवर जीव गमावण्याची वेळ आली.

आग लागलेले हॉटेल दिल्लीतील अग्रगण्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या 'मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल'च्या अगदी जवळ आहे. याबरोबर दिल्ली एम्सही हॉटेलपासून जवळच आहे. इतर मोठी रुग्णालये हॉटेलपासून जवळ आहेत. यामुळे विदेशी नागरिक जेव्हा दिल्लीत उपचारांसाठी येतात, तेव्हा ते मालवीयनगर परिसरातील हॉटेलमध्ये राहतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांपैकी बहुतांश जण एकतर उपचार घेत होते किंवा मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT