Mallikarjun Kharge
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना बंगळूर येथील एमएस रमैया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटकचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी सांगितले की, " डॉक्टरांनी पेसमेकर बसवण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे."