'मी टू' ने मल्याळम चित्रपटसृष्टीत हाहाकार File Photo
राष्ट्रीय

मल्याळम चित्रपटसृष्टी 'मी टू' | सिद्दीक आणि रंजीत यांनी दिला राजीनामा  

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस मल्याळम चित्रपटसृष्टीत  'मी टू' चर्चेत आहे. दरम्यान रविवारी (दि.२६) ज्येष्ठ अभिनेते सिद्दीकी यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तर रविवारीच केरळ चलचित्र अकादमीचे अध्यक्ष आणि संचालक रंजीत यांनीही राजीनामा दिला. (Malayalam industry's #MeToo)

मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांवरील अत्याचारांचा पर्दाफाश करणारा हेमा समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर काही दिवसांतच अधिक महिला त्यांच्याबाबतीत घडलेल्या घटनांची उदाहरणे पुढे येवू लागले आहेत.  

सिद्दीक आणि रंजीत यांनी दिला राजीनामा  

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते सिद्दीकी यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA-The Association of Malayalam Movie Artists) च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने आरोप केला आहे की, सिद्दीकी यांनी तारुण्यात अभिनेत्रीवर बलात्कार केला होता. तर रविवारीच केरळ चलचित्र अकादमीचे अध्यक्ष आणि संचालक रंजीत यांनीही राजीनामा दिला आहे.  बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने २००९ मध्ये आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. (Malayalam industry's #MeToo)

 हेमा समितीच्या अहवालात 'काय' म्हटले आहे... 

तीन सदस्यीय  हेमा समितीचा २९० पानांचा अहवालात असे म्हटले आहे की, स्थानिक चित्रपट उद्योगात 'शक्तिशाली पुरुषांच्या टोळ्या'चे वर्चस्व आहे आणि 'स्त्रियांचे लैंगिक शोषण सामान्य आहे'. त्याचबरोबर समान कामासाठी स्त्री-पुरुषां च्या वेतनातील प्रचंड तफावतीचाही यात उल्लेख आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश हेमा, ज्येष्ठ अभिनेते शरद आणि निवृत्त नोकरशहा केबी वलसाला कुमारी यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT