नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईल पिक्चरमध्ये तिरंग्याचा फोटो टाकला आहे. सर्व देशवासीयांनीही आपल्या प्रोफाईल पिक्चरमध्ये तिरंगा टाकण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. (PM Narendra Modi)
आपण सर्वांनी मिळून हर घर तिरंगा अभियानाला एक संस्मरणीय जनआंदोलन बनवायचे आहे. मी माझा प्रोफाईल फोटो बदलत आहे आणि तुम्ही सर्वांनीही असे करावे, ही विनंती करत आहे. तिरंग्यासोबतचा तुमचा सेल्फी
harghartiranga.com वर शेअर करा, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनाविषयीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
बापूंच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांना श्रद्धांजली, असे पंतप्रधानांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हा आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा क्षण होता, असेही यात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहीम सुरू केली होती.