मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरातील विमानसेवा खोळंबली  File Photo
राष्ट्रीय

Microsoft server issues | मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरातील विमानसेवा खोळंबली

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'मायक्रोसॉफ्ट'च्या सर्व्हरमध्ये अचानक मोठा बिघाड झाला. याचा फटका विमान सेवेला बसला. विमान कंपनीच्या सकाळी १०.४५ पासून चेक इन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे जगभरातील विमानसेवा खोळंबली. याचा फटका जगभरातील इंडिगो, अकासा आणि स्पायजेट या विमानसेवा कंपन्यांना बसला. ही तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एअरलाईन्ससोबत काम सुरू असल्याचे वृत्त आहे.

'या' सेवांवरही होऊ शकतो परिणाम- 'इंडिगो'चे स्पष्टीकरण

'इंडिगो' या विमानसेवा कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, "मायक्रोसॉफ्ट आउटेजचा आमच्या सिस्टमवर सध्या परिणाम झाला आहे. या सर्व्हरचा परिणाम इतर विमानसेवा कंपन्यांवरही होत आहे. या काळात बुकिंग, चेक-इन, तुमच्या बोर्डिंग पासवर प्रवेश आणि काही फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो " असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

स्पाइसजेटकडून मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग सुविधा

स्पाइसजेट या विमानसेवा कंपनीने म्हटले आहे की, "आम्ही सध्या आमच्या सेवा घेणाऱ्यांसोबत तांत्रिक आव्हाने अनुभवत आहोत. ज्यामुळे बुकिंग, चेक-इन आणि बुकिंग कार्यक्षमता व्यवस्थापित करणे यासह ऑनलाइन सेवांवर परिणाम होत आहे. परिणामी, आम्ही विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया सक्रिय केल्या आहेत. आम्ही विनंती करतो. आगामी प्रवास नियोजित असणाऱ्या प्रवाशांनी आमच्या कंपनीच्या काउंटरवर चेक-इन पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर विमानतळावर पोहोचावे. कृपया संयम ठेवा आणि सहकार्य करा असे आवाहन कंपनीने एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये केले आहे.

विमान उड्डाणाच्या अद्ययावत उड्डाण ऑफलाईन चौकशी करण्याच्या सूचना

मायक्रोसॉफ्ट ऑटेजचा परिणाम भारतातील विमानसेवा आणि विमानतळांवर देखील झाला आहे. एएनआयने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल 3 मधील व्हिज्युअल शेअर केले आहे. दरम्यान विमानतळ प्रशासनाने एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, "जागतिक आयटी समस्येमुळे, दिल्ली विमानतळावरील काही सेवांवर तात्पुरता परिणाम झाला. आमच्या प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व स्टेकहोल्डर्ससोबत जवळून काम करत आहोत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी विमान कंपनीच्या संपर्कात राहावे. अद्ययावत उड्डाण माहितीसाठी संबंधित एअरलाइन किंवा विमानतळावरील हेल्पडेस्कशी संपर्क करावा."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT