पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील व्हीआयपी रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या सातव्या मजल्याचे सेंटरिंग कोसळल्याने ११ कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यापैकी दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सात जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. दोन कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी गौरव सिंह यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. बचाव कार्य सुरू आहे.