नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यसमितीची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या बैठकीतही महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभेत मात्र सपाटून मार खावा लागला. कॉंग्रेसच्या या पराभवाची चर्चा देशभर झाली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या पदाचा राजीनामा देतील अशाही चर्चा होत्या. मात्र अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही. मात्र काँग्रेसच्या राज्य संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. याच फेरबदलांचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, नव्याने संघटना बांधणीसाठी काँग्रेस पक्ष नेत्यांच्या नावावर विचार करत असल्याचे समजते.