व्यावसायिक सिलिंडरचे दर जाणून घ्या  file photo
राष्ट्रीय

LPG Cylinder Prices | मे महिन्याची चांगली सुरुवात, सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलिंडर दरात कपात

LPG Gas price Reduced | मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी दरात बदल

स्वालिया न. शिकलगार

LPG Cylinder Prices

नवी दिल्ली : मे महिन्यांची सुरुवात चांगली झाली आहे. आज गुरुवार १ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या अपडेट्स दरांनुसार, १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १४.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, एप्रिलमधील शेवटच्या बदलापासून घरगुती एलपीजीच्या किमती जैसे थे आहेत.

सध्या घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. १ मे रोजी गॅसच्या किमतीतील बदलानुसार, आता राजधानी दिल्लीत १९ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी १७४७.५० रुपये द्यावे लागतील. गेल्या एप्रिल महिन्यात याचा दर १७६२ रुपये आणि मार्चमध्ये १८०३ रुपये होता. म्हणजेच १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत दोन महिन्यांत ५५.५ रुपयांनी कमी झाली आहे. तर एका महिन्यात सिलिंडर १४.५ रुपयांनी कमी झाली आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी

१ मे २०२५ पासून लागू होणाऱ्या १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या सुधारित किमती पुढीलप्रमाणे :

दिल्ली : १,७४७.५० रु. (एप्रिलमध्ये मधील दर १,७६२ वरून कमी)

कोलकाता : १,८५१.५० रु. (१,८६८.५० वरून कमी)

मुंबई: १,६९९ रु. (१,७१३.५० वरून कमी)

चेन्नई : १,९०६.५० रु. (१,९२१.५० वरून कमी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT