Mahakumbh 2025 : 41 कोटी भाविकांनी केले पवित्र स्‍नान, आज अनेक व्हीआयपी येणार File Photo
राष्ट्रीय

प्रयागराजमध्ये 41 कोटी भाविकांनी केले पवित्र स्‍नान, आज अनेक व्हीआयपी लाेक येणार

Mahakumbh 2025 : महाकुंभात आज व्हीव्हीआयपी लोक करणार स्‍नान

निलेश पोतदार

प्रयागराज : पुढारी ऑनलाईन

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्‍कर सिंह धामी, केंद्रीय संस्‍कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके. शिवकुमार यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी लोक आज प्रयागराजमध्ये पवित्र स्‍नानासाठी हजेरी लावणार आहेत. आज (रविवार) दुपारी २:३० वाजता विशेष विमानाने बमरौली विमानतळावर आगमन होणार आहे. ते संगमात स्‍नान केल्‍यानंतर उत्तराखंड मंडपम्, सेक्‍टर-०७ मध्ये फेरफटका मारतील. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते रवाना होणार आहेत.

४१ कोटींहून अधिक भाविकांनी केले पवित्र स्‍नान

त्रिवेणी संगमात पवित्र डुबकी घेण्यासाठी महाकुंभात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. आतापर्यंत जवळपास ४१ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्‍नानाची पर्वणी साधली आहे.

महाकुंभ प्रशासनाचा दावा..भाविकांची संख्या ६० कोटीवर पाेहाेचणार 

महाकुंभात लोक दिवस-रात्र पायी चालत १० ते १२ किमी चे अंतर आनंदात पार करत आहेत. लाखो लोक आपल्‍या तीन्ही पिढ्यांच्या नातलगांसह संगमात स्‍नान करत आहेत. प्रशासनाने दावा केला आहे की, जर अशीच गर्दी राहिली तर महाकुंभमेळा संपेपर्यंत भाविकांची संख्या ६० कोटींच्या पुढे पोहोचेल. देशाच्या अनेक राज्‍यातून संगमात पवित्र स्‍नानासाठी आलेल्‍या भाविकांनी आपली मते व्यक्‍त केली. या ठिकाणी आल्‍यानंतर आम्‍ही आमचे सर्व दु:ख आणि कष्‍ट विसरून गेल्‍याची भावना व्यक्‍त करत मुलांनाही खूप छान वाटल्‍याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT