Love story in prison 
राष्ट्रीय

Love story in prison : ‘किसी मनचले पे दिल आ गया तो बडी मुश्किल!’ मध्यप्रदेशात महिला डेप्युटी जेलरने केले जन्मठेपेतील कैद्याशी लग्न!

डेप्यटी जेलर मुस्लिम तर कैदी हिंदू, परिवाराच्या विरोधात जाऊन घेतला निर्णय, अनोखा विवाह झाला व्हायरल

Namdev Gharal

Love story in prison ‘प्रेम कुठे, कधी, कसे, कोणावरही होऊ शकते’ असे म्हटले जात, हे सिद्ध करणारी घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे. कायद्याचे रक्षण करणारी महिला व कायदा भंग करणारा गुन्हेगार यांच्यात झालेले प्रेम समाजाची बंधने झुगारुन आता विवाहबंधनात अडकले आहे. या विवाहाची चर्चा आता देशभर सूरू झाली आहे.

जेलमध्ये जुळले प्रेमसंबध

याची कहाणी अशी की 2007 मध्ये एका नगरसेवकाच्या हत्‍या प्रकरणात धर्मेंद्र सिंग या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो सतना मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता यावेळी कारागृहात वाँरट इनचार्ज म्हणुन कार्यरत असलेल्या फिरोजा खातून यांचे धर्मेद्र सिंग यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले, यातून या कहाणीला सुरवात झाली. जेल मध्येच फूललेले हे प्रेम आता धर्मांची बंधने ताेडून विवाह बंधनात अडकले आहेत. धर्मेंद्र सिंग हा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्‍यांनी काही वर्षे वाट पाहिली व आता लग्नबंधनात अडकेले आहेत.

तोपर्यंत महिला अधिकाऱ्याने प्रेमाची वाट पाहिली

धर्मेद्र याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती त्‍यामुळे तो सतना जेलमध्ये शिक्षा भोगत होता. धर्मेंद हा कारागृहात असताना वॉरंट संबधी कामांमध्ये जेल प्रशासनाची मदत करत असे यातूनच फिरोजा खातून व धर्मेंद्र यांच्यात ओळख वाढली. त्यांच्यात कामासंबधी संवाद होत होते यातून त्‍यांच्या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. जवळपास 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर धर्मेंद्रची 2020 मध्ये चांगल्या वर्तुणूकीच्या आधारावर जेलमधून सुटका झाली. पण जेलमध्ये असलेल्या प्रेमासाठी खातूनने तो बाहेर येईपर्यंत वाट पाहिली. व त्‍यांनतर त्‍यांची प्रेमकहाणी सुरुच राहिली व त्‍यांनी शेवटी लग्न करण्याचा निर्णय

हिंदू पद्धतीने विवाह

या विवाहाला फिरोजाच्या घरच्यांचा विरोध होतो कारण दोन्ही वेगळ्या धर्मातील होते . त्‍यामुळे फातिमाच्या घरचे कोणीही या विवाहासाठी हजर नव्हते. फिरोजा मुस्लिम व धर्मेंद्र हिंदू असून या दोघांचा विवाह हिंदू प्रथेप्रमाणे 5 मे 2026 रोजी छत्तरपूर जिल्ह्यात पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT