पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात आज (दि. २) सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बिछिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक झाली, असे पोलिस महासंचालक (डीजीपी) कैलाश मकवाना यांनी सांगितले.
घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, एक सामान्य रायफल, वायरलेस सेट आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. इतर नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे, असेही डीजीपी मकवाना यांनी सांगितले.