Salon Fight Video pudhari
राष्ट्रीय

Salon Fight Video: इराण-अमेरिका युद्धाच्या आठवणी ताज्या; पार्लरमध्ये दोन महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंझ्या

Anirudha Sankpal

Lucknow Salon Fight Video: उत्तर प्रदेशातील लखनौमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका पार्लरमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे दिसत आहे. सुरूवातीला या दोन महिलांमध्ये शाब्दिक देवाण घेवाण सुरू होती. त्यानंतर प्रकरण एवढं वाढतं की या दोघीही एकमेकींचे केस ओढून मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

या व्हिडिओत दोन तरूण या महिलांना शांत करण्याचा आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या दोघांना यात काही यश आलं नाही. या महिलांनी आपले भांडण सुरूच ठेवलं अन् एकमेकींना अश्लील शिव्यांची लाखोली देखील वाहिली.

नेमकं काय घडलं?

या दोन महिलांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून इतके टोकाचे भांडण झालं हे अजून समोर आलेलं नाही. एक महिला पार्लरमधील खुर्चीवर बसली होती. एक पुरूष तिचे केस पुसत होता. दुसरीकडे काऊन्टरवर एक दुसरी महिला बसली होती. या दोघींमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून शाब्दिक वादावादी सुरू झाली. यावेळी केस पुसणाऱ्या युवकाने मध्यस्थी करत दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघी शांती वार्ताच्या मूडमध्ये काही नव्हत्या.

बघता बघता वातावरण चिघळलं अन् खुर्चीवर बसलेली महिला उठली अन् तिनं थेट काऊंटरवरील महिलेच्या केसांनाच हात घातला. ही हाणामारी पाहून जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाची आठवणं उपस्थितांना झाली.

तरूण मध्यस्थी करून दमले

या महिलांच्या युद्धात पहिल्यांदा मध्यस्थी झाली अन् दोघी शांत झाल्या. मात्र पुन्हा काहीतरी बिनसलं अन् पुन्हा केसांना पकडून एकमेकींना वाकवण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुन्हा तरूणांना मध्यस्थी केली मात्र आता या महिलांनी काऊंटर सोडून समोर ठेवलेल्या कोचवर आपली हाणामारी सुरू केली. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तरूणांनी या दोघांची भांडणे सोडवली. त्यानंतर या दोघी देखील आपल्या फोनवरून कोणाला तरी बोलवत होत्या.. यावरून पार्लरमध्ये तिसरं महायुद्ध तर सुरू होणार नाही ना अशी भीती उपस्थितांमधून व्यक्त केली जात होती.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका युजरने छोटा वाद वेळीच सोडवला नाही तर काय होतं याचं हे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक ठिकाणी संयम आणि संवादाने प्रकरण मिटवलं पाहिजे असं देखील तो म्हणाला.

दुसरा एक युजर म्हणतो की, मुली ज्यावेळी आपापसात भांडतात त्यावेळी त्यांच्या तोडांतून फुलांची बरसात होत असते. या युजरने महिलांनी ज्या प्रकारे एकमेकींना अश्लील शिवीगाळ केली त्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT