उत्तर प्रदेश रेल्वे मधून सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका रेल्वे कर्मचाऱ्यांने रजा मंजूर होत नसल्याने आपले दुखणे सरळ साहेबांसमोर उघड केले आहे. या कर्मचाऱ्याला मुळव्याधीचे दुखणे होते त्याचे ऑपरेशनही झाले होते पण जखम वाळलेली नसल्याने ते डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होती. पण ऑफिसमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी त्याची रजा मंजूर केली नाही. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट साहेबांसमोर आपली पॅन्टच उतरली. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना प्रशासकीय संवेदनशून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की लखनौमध्ये रेल्वे विभागातील एक लोको पायलट राजेश यांचे काही दिवसांपूर्वीच मुळव्याधचे (Piles) ऑपरेशन झाले होते. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आपरेशन झाले असतानाही त्यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. त्यामुळे देवेंद्र कुमार तणावात होते. त्यांनी शस्त्रक्रियेसहीत, मेडिकलची कागदपत्रे वरिष्ठांना सादर केली व रजेसाठी अर्ज दाखल केला.
वरिष्ठांनी नाकारला रजेचा अर्ज
राजेश यांचे 22 फेब्रुवारी रोजी पाईल्सचे ऑपरेशन झाले होते. आपरेशनसाठी त्यांना रजा मिळाली पण जखम ओली असल्याने विश्रांती घेण्यास सांगितले. त्यांनतर 28 फेब्रुवारी रोजी राजेश यांनी बॉस रतन कुमार यांच्यासमोर हजर राहून आपली व्यथा सांगितली व रजा वाढवून देण्याची विनंती केली. राजेश यांनी सर्व मेडिकल कागदपत्रे डॉक्टरांचे सर्टफिकेट रतन कुमार या आपल्या वरिष्ठांसमोर सादर केले पण रतन कूमार यांनी रजा नामंजूर केली. यामुळे वैतागलेल्या राजेश यांनी असे पाऊल उचलले.
लोको पायलटचे काम जोखमीचे असून त्यांना तासनतास बसून रेल्वे चालवावी लागते राजेश मिना यांनाही मुळव्याधच्या ऑपरेशनमुळे रेल्वे इंजिनमध्ये तासनतास बसून काम करणे अशक्य होते. त्यामुळेच त्यांनी रजेचा अर्ज केला होता.
रतन कुमार यांच्यावर होणार कारवाई
कार्यालयात गेल्यानंतरही राजेश यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले, तेव्हा त्यांनी हतबल होऊन आणि संताप व्यक्त करण्यासाठी रतन कुमार या अधिकाऱ्यांसमोर आपली पँट उतरवली. याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली असून , रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.