lpg price today no change in rates check differrent city price here
पुढारी ऑनलाईन : LPG Price Today : एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाल्यास त्याचा परिणाम गृहीणींच्या खर्चावर होत असतो. त्यामुळे एलपीजीच्या किंमतीवर सर्वसामांन्याचे लक्ष असते. तसेच व्यावसायीक सिलिंडरच्या किंमतीतील वाढीचा परिणामही उद्योगांवर होत असतो. त्यामुळे सध्याचे देशातील महत्वाच्या शहरातील सिलिंडरच्या दराची माहिती जाणून घ्या..
एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये आज 31 ऑक्टोबर रोजी कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ केली होती. त्यावेळी दरात 72 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. यावर्षी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत 10 पैकी 8 महिन्यांच्या सुरुवातीला 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहेत.
दुसरीकडे, 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत आतापर्यंत केवळ दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. जुन्या ट्रेंडनुसार, उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ किंवा कपात होण्याची शक्यता आहे.
(Domestic Cylinder Price Today)
14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरचे आजचे दर दिल्ली - 939.50 रुपये
मुंबई - 968 रुपये
पटना - 1031.50 रुपये
बेंगळुरू - 944.50 रुपये
जयपूर - 945.50 रुपये
चंदीगड - 951.50 रुपये
लखनऊ - 979.50 रुपये
हैदराबाद - 994 रुपये
भुवनेश्वर - 968.50 रुपये
(Commercial Cylinder Price Updates)
19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे आजचे दर
दिल्ली - 2810 रुपये
नोएडा - 2747.50 रुपये
मुंबई - 2954 रुपये
पटना - 3100 रुपये
बेंगळुरू - 2764 रुपये
जयपूर - 2839 रुपये
चंदीगड - 2833 रुपये
लखनऊ - 2932 रुपये
हैदराबाद - 3065 रुपये
भुवनेश्वर - 2988 रुपये
घरगुती सिलेंडर कधी-कधी महाग झाला? (LPG Price Hike Updates)
2026 मध्ये आतापर्यंत केवळ दोन वेळा घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. पहिल्यांदा मार्च महिन्यात सिलेंडरचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा जून महिन्यात किमतींमध्ये वाढ झाली होती. कंपन्यांनी शेवटच्या वेळी सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ केली होती.
सिलेंडर बुकिंगचे नियम झाले अधिक कडक (LPG Booking Rules)
पूर्वीच्या तुलनेत आता एलपीजी सिलेंडर बुक करणे अधिक कठीण झाले आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय घरगुती सिलेंडरची बुकिंग करता येत नाही. याशिवाय, सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठीही ओटीपीची आवश्यकता असते. काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने बुकिंग आणि डिलिव्हरीचे नियम अधिक कडक केले आहेत.