पुढारी ऑनलाईन डेस्क
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजप खासदार ओम बिर्ला यांची बुधवारी निवड झाली. आवाजी मतदानाने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. ओम बिर्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे लोकसभा अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत घेऊन गेले.
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजप खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली. आवाजी मतदानाने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांच्या लोकसभा अध्यक्षपदी निवडीसाठी प्रस्ताव मांडला.
'एनडीए'तील १३ पक्षांचा ओम बिर्ला यांना पाठिंबा दिला.
लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव पीएम मोदी यांनी लोकसभेत मांडला. त्याला राजनाथ सिंह यांनी अनुमोदन दिले.
एनडीए २९३
इंडिया २३३
इतर १६
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत म्हणाल्या, "आम्ही मतदान करू. माझी पक्षाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. आम्ही खूप उत्साही आहोत. माझ्यासाठी ही पहिलीच वेळ आहे. आम्ही सत्तेत असल्याने आमचा उमेदवारच अध्यक्षपदाची निवडणूक जिंकेल..."
लोकसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "निवडणूक होणारच, आपण निकालाची वाट पाहिली पाहिजे..."
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला संसदेत पोहोचले.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, "याला भाजप जबाबदार आहे. सत्तेची लालसा आणि लोकशाहीला चिरडून टाकण्याचा हेतू यामुळे ही निवडणूक होत आहेत.. परंपरा, नियम पाळले गेले असते तर भाजपकडे बिनविरोध अध्यक्षपद गेले असते. पण भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सहजासहजी जिंकू देणार नाही. आम्ही लोकशाही परंपरेसाठी आवाज उठवू."
ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रस्ताव मांडणार.