राष्ट्रीय

सभेत राहुल गांधींनी स्‍वत:च्या डोक्यावर ओतले पाणी; आचार्य प्रमोद कृष्णम संतापले, म्‍हणाले…

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन ; काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उत्‍तर प्रदेशच्या देवरीया येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी भाषणादरम्‍यान राहुल गांधी हे भीषण गर्मीमुळे हैराण झाल्‍याचे दिसले. त्‍यांनी एका बाटलीतील पाणी पिले आणि सभेला उपस्‍थित लोकांना म्‍हणाले 'गरमी खूप आहे.' यानंतर राहुल गांधी यांनी बाटलीतील उरलेले पाणी आपल्‍या डोक्‍यावर ओतून घेतले. हे दृष्‍य पाहून जमलेल्‍या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली. राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्‍यावर नाराजी व्यक्‍त करत आचार्य प्रमोद कृष्‍णम यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्‍त्र सोडले आहे.

"परदेशी वातावरणात वाढलेले राहुल गांधी…"

आचार्य प्रमोद कृष्‍णम यांनी म्‍हटले की, राहुल गांधी यांचा एकच अजेंडा आहे तो म्‍हणजे बिना तोंड धुता मोदींवर टीका करणे. सकाळी उठल्‍यावर हात-तोंड न धुता ते पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करायला सुरूवात करतात. ज्‍या व्यक्‍तीला माहिती नाही की, आपले स्‍वत:चे उष्‍ठे पाणी आपल्‍यावर ओतून घेवू नये, अशी व्यक्‍ती पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत असते. खरी गोष्‍ट ही आहे की, राहुल गांधी यांना भारताची संस्‍कृती, सभ्‍यता, परंपरांविषयी माहिती नाही. परदेशी वातावरणात वाढलेल्‍या राहुल गांधी यांनी पहिल्‍यांदा भारताला जाणून घेतले पाहिजे. यानंतर त्‍यांनी भारताच्या पंतप्रधानांवर बोलावे.

अनेक राज्ये उष्णतेच्या विळख्यात आहेत

राहुल गांधी हे सातव्या आणि शेवटच्या टप्यातील मतदानाआधी देवरिया येथे सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. यंदा लोकसभेची निवडणुक ऐन उन्हाळ्यात आली आहे. त्‍यातच देशातील अनेक राज्‍यांमध्ये भीषण उष्‍णता जाणवत आहे. अनेक ठिकाणी उष्‍णतेची लाट जाणवत आहे. अनेक राज्‍यांमधील जनता तीव्र उष्‍णतेमुळे त्रस्‍त आहे. अशातच राहुल गांधी हे देखील उष्‍णतेमुळे हैराण झाल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी भाषण थांबवून पहिला थोडे पाणी घेतले. ते म्‍हणाले खूप उष्‍णता आहे आणि त्‍यांनंतर त्‍यांनी उरलेले बाटलीतील पाणी आपल्‍या डोक्‍यावर ओतून घेतले.

बनसगाव मतदारसंघातून 8 उमेदवार रिंगणात आहेत

देवरियामध्ये राहुल गांधी बनसगाव (राखीव) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सदल प्रसाद यांच्यासाठी मते मागत होते. या लोकसभा जागेत गोरखपूर जिल्ह्यातील चौरी-चौरा, बांसगाव आणि चिल्लुपार हे विधानसभा मतदारसंघ आणि देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर आणि बरहज या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

बांसगांव लोकसभा मतदारसंघातून 8 उमेदवार रिंगणात असून, भाजपचे उमेदवार कमलेश पासवान आणि काँग्रेसचे सदल प्रसाद यांच्यात मुख्य लढत आहे. या जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT