राष्ट्रीय

लोकसभा निवडणूक २०२४ : मतदानाचा उत्साह; सकाळी ११ पर्यंत २६.३ % मतदान

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत आज (दि.१) मतदान होत आहे. देशात सकाळी ११ पर्यंत पाहता मतदान २६.३ ट्क्के झाले आहे. Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात  आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत आज (दि.१) मतदान होत आहे. सकाळी ७ वा. पासून मतदान सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात १० कोटी ६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १३ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल ९, बिहार ८, ओडिशा ६, हिमाचल प्रदेश ४, झारखंड ३ व चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.

विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

  • पंजाब – २३.९१ %
  • उत्तर प्रदेश – २८.०२  %
  • पश्चिम बंगाल – २८.१०  %
  • बिहार – २४.२५  %
  • ओडिशा – २२.६४ %
  • हिमाचल प्रदेश – ३१.९२ %
  • झारखंड – २९.५५ %
  • चंदीगड – २५.०३ %

वरील आकडेवारी पाहता लक्षात येईल की, हिमाचलप्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे ३१.९२ % मतदान झाले आहे, तर सर्वात कमी मतदान २३.९१ % मतदान झाले आहे.

मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे

मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ३ केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

देशात या टप्प्यात झाले मतदान

यंदा लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात होत आहेत. या सात टप्प्यातील सहा टप्प्यातील मतदान झाले आहे. तर अखेरच्या सातव्या टप्प्याचे मतदान आज (दि.१) मतदान होत आहे.

1) 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान, 102 जागा.
2) 26 एप्रिलला दुसर्‍या टप्प्याचे मतदान, 89 जागा.
3) 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्याचे मतदान, 94 जागा.
4) 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान, 96 जागा.
5) 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान, 49 जागा.
6) 25 मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा.
7) 1 जूनला सातव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा. (मतदान होत आहे.)

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT