राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: शनिवार १ जून रोजी लोकसभा निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. यासाठी आज शेवटच्या टप्प्यातील लोकसभा नवडणूक प्रचार होत आहे. आज सांयकाळपासून संपूर्ण लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावणार (Lok Sabha Election 2024) आहेत. लोकसभा शेवटच्या मतदान टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

देशात लोसकभा निवडणुकीचा कार्यक्रम एकूण ७ टप्प्यात पार पडला. दरम्यान शनिवार १ जून रोजी लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा ८ राज्यांमध्ये होत आहे. यामध्ये बिहार (८), चंदीगड (१), पश्चिम बंगाल (९), पंजाब (१३), हिमाचल(४), उत्तर प्रदेश (१३), झारखंड(३) आणि ओडिशा (३) या राज्यात ५७ मतदारसंघात मतदान (Lok Sabha Election 2024) होत आहे.

लोकसभा शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.३०मे) पंजाबमध्ये आहेत. निवडणूकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर देशाचे संपूर्ण लक्ष आत बुधवार ४ जूनला जाहीर होणाऱ्या लोकसभा निकालाकडे असणार आहे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

SCROLL FOR NEXT