नवी दिल्ली : दोन वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबतची सुनावणी जानेवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.
२२ जानेवारी २०२५ ही या सुनावणीची संभाव्य तारीख न्यायालयाच्या वेळापत्रकात दाखवण्यात आली आहे. दरम्यान, मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झाली नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी किती काळाने होतील, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.