पुढारी ऑनलाईन डेस्कः आंध्रपदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील सुर्यारुपलेम या गावात आज (बुधवार ३० ऑक्टोबर)वीज कोसळली. या घटनेत एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाला. हा कारखाना गावाच्या बाहेर आहे. वीज पडली त्यावेळी अनेक कामगार याठिकाणी काम करत होते. यामध्ये एकूण १० कामगार जखमी झाले यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत झालेल्या दोन्ही महिला आहेत. वीज कोसळल्याने कारखान्यात असलेल्या दारुमुळे आग अचानक भडकली. यावेळी अनेक कामगार येथे काम करीत होते. डिसीपी जी.देवकुमार यांनी या घटनेची माहिती दिली.तसेच गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.