पुढारी ऑनलाईन : कन्नड आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री रान्या राव ( Ranya Rao) हिला बंगळूरू विमानतळावर सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १२ कोटी रुपयांचे १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. रान्या राव ही अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरील (आयपीएस) अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे कर्नाटक पोलीस दलातही खळबळ माजली आहे. महसूल गुप्तचर विभागाकडून (डीआरआय) सध्या तिची चौकशी सुरु असून, या चाैकशीत तिने अनेक मोठे खुलासे केले आहेत. (Gold smuggling case)
रिपाेर्टनुसार, महसूल गुप्तचर विभागाकडून (डीआरआय) सुरु असणार्या चौकशीत रान्या रावने खुलासा केला आहे की, यूट्यूब (YouTube) वरील व्हिडिओ पाहून सोन्याची तस्करी कशी करावी, याची माहिती घेतली. यापूर्वी कधीही दुबईहून सोने खरेदी केले नव्हते. दुबईहून बंगळूरला साेने तस्करी करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. केवळ दुबईच नाही तर युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्व देशांनाही भेट दिली असल्याचे तिने चाैकशीत सांगितले. मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये रान्या रावने ३० वेळा दुबईला भेट दिली असून, प्रत्येक प्रवासात अनेक किलो सोन्याची तस्करी केी असल्याचा 'डीआरआय'चा संशय आहे.
गेल्या वर्षी रान्या रावने ३० वेळा दुबई शहराला भेट दिली. केवळ १५ दिवसांमध्ये चार वेळा तिने दुबईला भेट दिली हाेती. प्रत्येक प्रवासात अनेक किलो सोन्याची तस्करी झाली. चौकशीदरम्यान नोंदवलेल्या तिच्या जबाबात रान्या रावने म्हटलं आहे की, तिच्याकडून १७ सोन्याच्या बार जप्त करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया शक्य तितकी खासगी ठेवावी, अशी विनंतीही तिने चाैकशी अधिकार्यांकडे व्यक्त केली आहे.
रान्या रावने मागील वर्षी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेचा प्रवास केला आहे. दुबई, सौदी अरेबियाला भेट दिली आहे. तपासात सहकार्य करेन आणि जेव्हा जेव्हा मला बोलावले जाईल तेव्हा तुमच्यासमोर हजर राहणार असल्याचेही तिने म्हटले आहे. दरम्यान, 'डीआरआय' अधिकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोपही तिने केला होता.
दुबईत भारताच्या तुलनेत सोने स्वस्त आहे. कारण दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही आयात शुल्क आकारला जात नाही. तसेच दुबईमध्ये सोने विक्री करण्याची संख्या खूप अधिक आहे. तेथे उत्कृष्ट दर्जाचे सोने मिळते, या कारणांमुळे दुबईत साेने खरेदी करुन अन्य देशात विक्रीचे प्रमाण अधिक आहे.
भारतातील एक पुरुष प्रवासी दुबईहून कोणत्याही सीमाशुल्काशिवाय किमान २० ग्रॅम सोने आणू शकतात. त्याची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत असावी. महिलांना ४० ग्रॅमपर्यंत सोने आणण्याची परवानगी आहे. त्याची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. १५ वर्षांखालील मुलांनाही ४० ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे, परंतु त्यासाठी नाते सिद्ध करणे आवश्यक असेल. भारतात, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) सोने आणण्यावर शुल्क निश्चित केले आहे. तुम्ही शुल्क भरले तर तुम्ही हवे तितके सोने खरेदी करू शकता.