पोलिसांनी धाडली प्रसिद्ध यूट्यूबर मृदुल तिवारीला नोटीस Pudhari Photo
राष्ट्रीय

मजुरांना चिरडलेली ती 'लॅम्बोर्गिनी' युट्यूबरच्या नावावर! पोलिसांनी धाडली नोटीस

Lamborghini accident Noida | पोलिसांकडून युट्यूबरची कसून चौकशी

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोएडामध्ये एका लॅम्बोर्गिनी कारने दोन जणांना धडक दिली, ज्यामुळे ते जखमी झाले. ही कार प्रसिद्ध यूट्यूबर मृदुल तिवारी यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताच्या तपासासाठी पोलिसांनी मृदुल यांना चौकशीसाठी बोलावले. ही घटना रविवारी संध्याकाळी नोएडाच्या सेक्टर 94 येथे घडली. कार चालवणारा दीपक हा कार दलाल असून, तो जयपूरचा रहिवासी आहे. अपघातानंतर लोकांनी त्याला घेरले आणि जाब विचारला. लोक ओरडले, "तू स्टंट दाखवत होता का? लोक मरतात, तुला काही कल्पना आहे का?" यावर दीपकने विचारले, "इथे कुणाचा मृत्यू झाला आहे का?" यानंतर स्थानिक नागरिक आणि नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक चौकशीत दीपकने सांगितले की, तो कारची टेस्ट ड्राइव्ह घेत होता आणि ती त्याची नव्हती. पोलिस आता शोध घेत आहेत की मृदुल तिवारी यांचा या घटनेशी काही संबंध आहे का. अपघातानंतर पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. पोलिसांनी कार जप्त करून दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Noida lamborghini accident | लॅम्बोर्गिनी ही युट्यूबर मृदुलची

तपासात असे दिसून आले आहे की, दोन्ही कामगार छत्तीसगडचे रहिवासी आहेत. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कार चालकाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसत आहे. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, लॅम्बोर्गिनी कार युट्यूबर मृदुल तिवारीच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताबद्दल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मृदुलला पोलिस ठाण्यात नेले आहे. मृदुल तिवारी हा देशातील एक प्रसिद्ध युट्यूबर आहे, तो युट्यूबवर विनोदी व्हिडिओ बनवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT