पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी ४.०५ वाजता एअर इंडियाच्या विमानाने ते दिल्ली जाणार होते. यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज रात्री उशिरा त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीतील एम्स येथे नेले जाण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून लालू यादव यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ पाटणा येथील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. लालू यादव यांच्यासोबत त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबातील इतर सदस्य आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारांसाठी दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. लालू यादव यांची अलीकडेच तब्येत सुधारली होती. पण, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. दरम्यान, आज रात्री उशिरा त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीतील एम्स येथे नेले जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्यावर माजी मुख्यमंत्र्यांवर सिंगापूरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.जुलै २०२४ मध्ये त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. मागील वर्षी लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले लालू प्रसाद यादव हे वैद्यकीय कारणास्तव जामिनावर आहेत.